वोट कर रायगडकर…. घोषणांनी दुमदुमले अलिबाग

रायगड अलिबाग दि.19, : जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी रायगड जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी अनेक उपक्रम सुरु केले आहेत. याच कार्यक्रमांतर्गत अलिबाग बीच येथून अलिबाग शहरात भव्य वॉकेथॉन रॅली काढण्यात आली. वोट कर रायगडकर…. चला मतदान करु या….लोकशाही मजबूत करु या…आपका वोट आपकी ताकद…एकच लक्ष्य मताचा हक्क…. मतदार राजा जागा हो..लोकशाहीचा धागा हो…या घोषवाक्यांनी अलिबाग बीच व शहर दुमदुमून गेले. जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी हिरवा झेंडा दाखवून या वॉकेथॉन रॅलीला अलिबाग बीच येथून सुरुवात झाली. आज सकाळी साडेसात वाजता अलिबाग बीच येथून सुरुवात होऊन रायगड जिल्हा परिषद,श्री समर्थ स्नॅक कॉर्नर,अलिबाग अर्बन बँक को.लि.,स्टेट बँक ऑफ इंडिया,अरुण कुमार वैद्य, जा.र.ह.कन्याशाळा, युनियन बँक, नगररचना कार्यालय, बस स्टँण्ड, रेवदंडा नाका, शेतकरी भवन,ठिकरुळ नाका, शिवाजी पुतळा,जामा मशिद,चावडी मोहल्ला,पोस्ट ऑफीस, अलिबाग बीच येथे रॅलीचा सांगता झाली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक...