जिल्ह्यातील निजामपूर जि.प.गट व आंबेवाडी पं.स.गण पोटनिवडणूक मतदार यादी कार्यक्रम
अलिबाग (जिमाका)
दि.19:- जिल्ह्यात माणगांव
तालुक्यातील जिल्हा परिषद गट क्र.45-निजामपूर व रोहा तालुक्यतील पंचायत समिती 80-आंबेवाडी
निर्वाचक गणामध्ये पोटनिवडणूकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
मतदार यादी
ग्राह्य धरण्याचा दिनांक 04/10/2019, राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या
तारखेस अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरुन जिल्हा परिषद व पंचायत
समित्यांमधील पोटनिवडणूकीकरीता तयार केलेली मतदार यादी हरकती व सूचना
मागविण्याकरीता प्रसिध्द करण्याचा दिनांक 02/11/2019, मतदार यादी संदर्भात हरकती व
सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक 06/11/2019, निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या
छापील मतदार याद्या अधिनियमाच्या कलम 13 खाली अधिप्रमाणित करण्याची तारीख
08/11/2019, निवडणूक विभाग व निर्वाचक गणांच्या छापील मतदार याद्या माहितीसाठी
ठेवण्यात आल्या आहेत. याबाबतची सूचना प्रसिध्द करण्याची तारीख 08/11/2019, मतदान
केंद्राची यादी व मतदान केंद्र निहाय मतदार यादी प्रसिध्द करणे दिनांक 11/11/2019
असा आहे असे तहसिलदार (सर्वसाधारण) जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांनी
कळविले आहे.
Comments
Post a Comment