Posts

Showing posts from January 25, 2026

प्रजासत्ताक दिनानिमित्त अलिबाग जिल्हा कारागृहात बंद्यांकरीता विविध विशेष स्पर्धा संपन्न

Image
    रायगड-अलिबाग,दि.27 (जिमाका) :-   दि. २६ जानेवारी २०२६ रोजी  भारताचा  ७७  वा प्रजासत्ताक दिन सभारंभ असून भारताची राज्यघटना अंमलात आल्याने पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.  हजारो देशभक्तांच्या बलिदानातून या दिवसाची प्राप्ती झालेली असल्याने हा आपल्या देशाचा सुवर्ण दिन आहे. या दिवशी देशभरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात त्या अनुषंगाने कारागृहातील दाखल बंद्यांना स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची तसेच प्रजासत्ताक दिनाची जाणीव व्हावी तसेच कारागृहातील बंदी सुध्दा या देशाचे नागरिक आहेत त्यांना देशाविषयी आपुलकी वाटावी व स्वत:चा आत्मविश्वास वाढावा याकरीता अलिबाग जिल्हा कारागृहातील  बंद्यांकरीता देशभक्तीपर गाणे, रांगोळी, मेहंदी,  चित्रकला स्पर्धा , बुध्दीबळ स्पर्धा, कॅरम स्पर्धा व देशभक्तीपर निबंधस्पर्धा (दि.२६ जानेवारी ) रोजी  विविध विशेष स्पर्धा संपन्न झाल्या. या विविध स्पर्धामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या बंद्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम.नेहा भोसले यांच्याहस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.       ...