महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत महिलांसाठी विशेष पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा कार्यक्रम संपन्न

रायगड(जिमाका)दि.19:- “ शासन आपल्या दारी ” उपक्रमांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग व ग्रामीण प्रगती फाउंडेशन, माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी मेमोरियल हॉल, निजामपूर रोड, मुंबई-गोवा हायवे जवळ, ता.माणगाव येथे जिल्ह्यातील बेरोजगार महिलांसाठी विशेष पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा कार्यक्रम महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी माणगाव उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अमिता पवार, ग्रामीण प्रगती फाउंडेशन सी.ई.ओ. मंगेश डफळे, संचालिका ज्योती डफळे, उणेगाव सरपंच राजेंद्र शिर्के उपस्थित होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, जिल्हा...