आदिवासी समाजातील युवक-युवतींना स्वयंरोजगारासाठी कर्ज योजना

 

 

रायगड(जिमाका)दि.18:- शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, नाशिक मर्या. यांच्यामार्फत आदिवासी समाजातील युवक-युवतींना स्वयंरोजगार करण्याच्या मूळ उद्देशाने अल्प व्याजदराने एन.एस.टी.,एफ.डी.सी,नवी दिल्ली योजनेमार्फत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

कर्ज योजनांसाठी पात्रता अटी पुढीलप्रमाणे :- लाभार्थी अर्जदार आदिवासी समाजाचा असावा. लाभार्थीची वर्यामर्यादा सर्व योजनांसाठी 18 वर्ष ते 45 वर्ष या दरम्यान असावी. वार्षिक कौटुंबिक ग्रामीण व शहरी भागासाठी उत्पन्नाची मर्यादा रु.3 लाख इतकी आहे. महिला सशक्तीकरण योजनेसाठी लाभार्थ्यांकडून कोणताही वैयक्तिक सहभाग मार्जीन मनी अपेक्षित नाही. तसेच जात प्रमाणपत्राबाबत महिलेच्या पतीचे अथवा मुला मुलींचे जात प्रमाणपत्र देखील ग्राह्य धरावे. महिला सशक्तीकरण कर्जावर द.सा.द.शे.4 टक्के एवढया अल्पदराने सरळ व्याज आकारले जाते. तहसिल किंवा उपविभागीय कार्यालय यांचा जातीचा दाखला (फक्त आदिवासी)  शाळा सोडल्याचा दाखला(वय वर्ष 18ते45), तहसिल कार्यालयाकडील उत्पन्नाचा दाखला (ग्रामीण व शहरी भागासाइी रु.3 लाख इतके असावे), व्यवसाय करण्यासाठी ग्रामपंचायत क्षेत्रासाठी स्वयंघोषणापत्र व नगरपालिका क्षेत्रासाठी दुकाने अधिनियमाखालील परवाना, व्यवसाय प्रकल्प अहवाल संबंधित शाखा व्यवस्थापक यांनी स्वत: इच्छूक लाभार्थींना मार्गदर्शन करुन संक्षिप्तरित्या तयार करुन देणे, व्यवसायासाठी लागणारे सर्व साहित्याचे कोटेशन, रेशनकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, तीन पासपोर्ट साईझ फोटो, वाहन व्यवसायासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) यांचे प्रचलित कायद्यानुसार आवश्यक कागदपत्रे, स्वत:चा हिस्सा म्हणून भरावी लागणारी 5 टक्के सहभाग रक्कम, रक्कम रुपये 5.00 लक्ष पेक्षा अधिक कर्ज योजनेसाठी एक सक्षम जामीनदार घेण्यात यावे.

बचतगट/सहकारी संस्थासाठी आवश्यक कागदपत्रे:- बचतगट/सहकारी संस्थेचे  नोंदणी प्रमाणपत्र, बचतगट/सहकारी संस्थेचे सर्व सभासद यादी,त्यांचे रेशनकार्ड व जातीचे दाखले, बचतगट/सहकारी संस्थेचे कमीत कमी सहा महिन्यांचे बँक खाते उतारा/स्टेटमेंट,व्यवसाय करण्यासाठी ग्रामपंचायत क्षेत्रासाठी स्वयंघोषणापत्र व नगरपालिका क्षेत्रासाठी दुकाने अधिनियमाखालील परवाना.,व्यवसायासाठी लागणाऱ्या साहित्याचे कोटेशन

या कर्ज योजनेत कोणत्याही प्रकारचे अनुदान अथवा सबसीडी नाही. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने  या संकेतस्थळावर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. तरी पात्र युवक-युवतींनी अर्ज करावेत असे आवाहन शाखा व्यवस्थापक राजेश पवार यांनी केले आहे.

००००००००

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक