अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या बळकटीकरणासाठी राज्यशासन कटीबद्ध ---महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे
रायगड(जिमाका)दि.12:- महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व बालकांच्या विकासासाठी नियमितपणे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिसांना बळकट करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले. कुरुळ येथील सुरुची हॉटेल सभागृहात एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद रायगड मार्फत आयोजित विविध योजना लाभ, साहित्य वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.यावेळी आमदार महेंद्र दळवी, माजी जि.स.श्रीमती दळवी, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी, सत्यजित बडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनित म्हात्रे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी निर्मला कुचिक, प्रकल्प संचालक,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रियदर्शनी मोरे, जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मनिषा पिंगळे आदि उपस्थित होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, अंगणवाडी सेविकांसाठी राज्य शासनाने मार्फत पेन्शन योजना लागू करण्याबाबतची ...