राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्याहस्ते संपन्न
रायगड-अलिबाग,दि.26(जिमाका):- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे आणि रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली, रायगड-अलिबाग येथील राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती सुनील तटकरे, यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा व माहिला बाल विकास अधिकारी, निर्मला कुचिक, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांच्यासह तालुका क्रीडा अधिकारी आणि प्रशिक्षक व खेळाडू उपस्थित होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती सुनील तटकरे म्हणाल्या की, पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला कबड्डी खो-खो टेबल टेनिस हॅण्ड बॉल या स्पर्धांचे आयोजन करायचे आहे, यासाठी जिल्हा नियोजन अंतर्गत विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या स्पर्धेसाठी बॉक्सिंग किट उपलब्ध करून दिली असून या स्पर्धेमध्ये मुंबई आणि कोकण विभागातून चार खेळाडू सहभागी होत आहेत. पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला ही संख्या अधिकाधिक वाढवायची आहे. यासाठी क्रीडा विभागाने अधिकाधिक काम क...