आदी कर्मयोगी अभियानांतर्गत महाड- कोतुर्डे येथे मेळावा संपन्न आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रशासन कटिबद्ध -- जिल्हाधिकारी किशन जावळे

 


 

रायगड अलिबाग, दि.24 (जिमाका):- आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावून त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी केंद्र सरकारने "धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष" अभियानांतर्गत "आदी कर्मयोगी" उत्तरदायी शासन हा राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रम सुरू केला आहे. रायगड जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 113 गावांमध्ये हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविला जाणार आहे. यापैकी महाड तालुक्यातील  पारवाडी व कोतुर्डे या 2 गावांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने प्रशासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

    जिल्ह्यात आदी कर्मयोगी उत्तरदायी शासन कार्यक्रमाला सुरुवात झाली असून  महाड तालुक्यातील कोतुर्डे - निवाची वाडी आदिवासी वाडी येथे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

      यावेळी महाड उपविभागीय अधिकारी पोपट ओमासे, तहसिलदार महेश  शितोळे, गटविकास अधिकारी स्मिता पाटील,  सहाय्यक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. खटकाळे, नायब तहसिलदार श्री.बाबासाहेब भाबड, सरपंच, उपसरपंच यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     यावेळी जिल्हाधिकारी श्री.किशन जावळे  यांनी आदि कर्मयोगी अभियानांतर्गत आपल्याला गावाचा विकास आराखडा तयार करणे. त्या आराखड्याला 2 ऑक्टोबर रोजी आपल्या ग्रामसभेत ठेवून मान्यता घेऊन ती सर्व कामे प्राधान्याने करावयाच्या सूचना दिल्या. आदिवासी बांधवांसाठी दळी जमिनीचे प्लॉट निश्चिती व वारस नोंद करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या.

     जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा राबविण्यात येत असून यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत आदिवासी बांधवांचे जन्म दाखलेबाबत विशेष मोहीम राबवून जन्म दाखले व आधार नोंदणी करण्याबाबत सूचित केले. महसूल विभागाचे राजस्व अभियान व ग्रामविकास विभागाचे मुख्यमंत्री पंचायतराज अभियान यांचा उद्देश तळागाळातील आदिवासी बांधवांना सशक्त करणे व गावांचा सर्वांगीण विकास साधणे त्याचप्रमाणे शासनाच्या सर्व योजनांचा लाभ पोहोचविणे हा आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

     या कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी श्री.जावळे यांच्या हस्ते धरती आबा योजनेंतर्गत दाखल्यांचे तसेच  शिधापत्रिका व आयुष्यमान भारत कार्ड चे वाटप करण्यात आले.

   कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी पोपट ओमासे यांनी केले.

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत