जल जीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्ह्यातील उत्तम काम - पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
अलिबाग,जि.रायगड,दि.12 (जिमाका) : जल जीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्ह्यात आत्तापर्यंत चांगले काम करण्यात आले असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी (ता.12) येथे दिली. तसेच जल जीवन मिशन अंतर्गत कामांसाठी शासनाकडून रायगड जिल्ह्याला निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत सुरू असलेल्या जिल्ह्यातील विविध पाणी पुरवठा योजनांचा आढावा गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री कु. आदिती तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार रवींद्र पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, जल जीवन मिशन संचालक आर. विमला, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांसह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी या बैठकीत प...