दि.29 सप्टेंबर रोजी शौर्य दिनाचे आयोजन
रायगड-अलिबाग,दि.24(जिमाका):- जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहामध्ये दि.29 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला उपस्थित राहाण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग ले. कर्नल राहुल वैजनाथ माने (नि.), यांनी केले आहे.
भारताच्या उरी येथील लष्करी छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे प्रत्यूत्तर म्हणून भारतीय सैन्यदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईक केला होता. या घटनेला 9 वर्षे पूर्ण झाली असून भारतीय सैन्य दलांनी केलेली ही अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत व्यापक प्रसिध्दीव्दारे पोचविण्यासाठी व माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी शौर्य दिन साजरा करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे.
00000
Comments
Post a Comment