जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत जिल्ह्यात कल्याण संघटकांचे तालुकानिहाय दौरे कार्यक्रमाचे आयोजन
रायगड-अलिबाग,दि.26(जिमाका):- रायगड जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा पत्नी व अवलंबित यांना विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणे, आर्थिक मदतीची प्रकरणे, पेंशन विषयक कामे, नामनिर्देशन, माजी सैनिक ओळखपत्रे, दुसरे महायुध्द हयातीचे दाखले इत्यादी कामारिता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत तहसिल कार्यालयात कल्याण संघटकांचे दौरे आयोजित करण्यात येत आहेत. रायगड जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा पत्नी यांनी कल्याण संघटक यांचा दौरा कार्यक्रमानुसार त्यांच्या तहसिलदार कार्यालयात उपस्थित राहून आपल्या कामांचा निपटारा करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल राहुल वैजनाथ माने यांनी केले आहे.
तालुका निहाय दौरा कार्यक्रमांची माहिती पुढीलप्रमाणे :- पनवेल तालुका, पहिला व तिसरा मंगळवार, उरण तालुका, दुसरा व चौथा मंगळवार, खालापूर तालुका, पहिला गुरुवार, कर्जत तालुका दुसरा गुरुवार, पेण तालुका तिसरा गुरुवार, सुधागड पाली, चौथा गुरुवार, महाड तालुका पहिला व तिसरा सोमवार, माणगाव तालुका दुसरा सोमवार, पोलादपूर तालुका चौथा सोमवार, रोहा तालुका पहिला बुधवार, मुरुड तालुका दुसरा बुधवार तर तळा/म्हसळा/श्रीवर्धन या तालुक्यात तिसरा बुधवार.
0000000
Comments
Post a Comment