जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख अलिबाग येथे भूमि अदालतचे आयोजन

 

रायगड-अलिबाग,दि.23(जिमाका):- महसूल मंत्री महोदयांच्या निर्देशानुसार प्रलंबित अपिल प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्याकामी दि.29 सप्टेंबर, दि.30 सप्टेंबर,  दि.06 ऑक्टोबर व 07 ऑक्टोबर 2025 रोजी भूमि अदालत सकाळी 11.00 व दुपारी 3.00 वाजता या दोन सत्रात जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख रायगड-अलिबाग यांचे कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवारात, हिराकोट तळावाजवळ, अलिबाग येथे आयोजित करण्यात आली आहे, असे जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख रायगड-अलिबाग सुनिल इंदलकर यांनी कळविले आहे.

या तारखांमध्ये सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. सदर अपील प्रकरणांमध्ये अपिलार्थी यांनी उत्तरार्थी यांना सुनावणीच्या नोटीसा बजावण्याच्या आहेत व त्याची पोहोच सुनावणीवेळी सादर करावयाची आहे.

तसेच या तारखांना जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख रायगड कार्यालयाकडून फेरचौकशीकामी पाठविण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये व तक्रार अर्जावरील प्रकरणांमध्ये तालुका स्तरावरील कार्यालयांकडूनही सुनावणी घेण्यात येणार आहे.

या भूमि अदालतीद्वारे जिल्ह्यातील प्रलंबित अपिल प्रकरणांवर सुसंवादाच्या माध्यमातून न्याय व जलद निर्णय घेण्यावर भर दिला जाणार आहे. संबंधित नागरिकांनी किंवा अपीलकर्त्यांनी आपली सर्व आवश्यक कागदपत्रे व पुरावे सोबत घेऊन या तारखांना उपस्थित राहावे, जेणेकरुन प्रकरणांचा योग्य व अंतिम निपटारा करता येईल. भूमि अदालतेद्वारे तातडीने व पारदर्शक पध्दतीने प्रकरण सोडविण्याचा हेतू असून, त्यामुळे वेळेची व संसाधनांची बचत होणार आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत