राज्यस्तर शालेय बॉक्सिंगचा स्पर्धेचा थरार 26 सप्टेंबर पासून

 

रायगड-अलिबाग,दि.24(जिमाका):- शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या अधिपत्याखाली क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत रायगड जिल्ह्यास बॉक्सिग, खो-खो, हॅण्डबॉल, टेबल टेनिस, कबड्डी आणि कुस्ती या खेळांचे विविध वयोगटात्त राज्यस्तर स्पर्धा यजमानपद देण्यात आले आहे. या 6 खेळापैकी बॉक्सिग खेळाचे 17 वर्षे वयोगटातील मुले व मुलींच्या स्पर्धाचे आयोजन दि. 25 ते 28 सप्टेंबर 2025 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकूल नेहूली-संगम अलिबाग येथे होणार आहे.

या राज्य स्पर्धेत राज्यातील 8 महसूल व 1 राज्य क्रीडा प्रबोधिनीचा संघ असे विभागातील जवळपास 300 खेळाडू, संघव्यवस्थापक व मार्गदर्शक सहभागी होणार आहेत. या स्पर्धांमधून विजयी स्पर्धक हा राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. बॉक्सिंग स्पर्धेचा प्रचार प्रसार व्हावा तसेच जिल्ह्यात सर्वदुर या खेळाची वातावरण निर्मिती व्हावी या उद्देशाने तालुका संकूल समितीच्या माध्यमातून नेहूली येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रशस्त बंदिस्त हॉलमध्ये नव्या कोऱ्या बॉक्सिंग रिंगची स्थापना करण्यात आली असून राज्यातून येणाऱ्या बॉक्सर्सना आपला खेळाचा दर्जा सिध्द करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे..

या राज्यस्तर शालेय बॉक्सिंग स्पर्धेचा उद्घाटन सोहळा दि.26 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, अलिबाग नेहुली-संगम येथील भव्य पटांगणात संपन्न होणार आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत