ग्रामोद्योग भरारी पुरस्कार-2026 करिता इच्छुक उद्योजकांनी अर्ज सादर करावेत
रायगड-अलिबाग, दि.१६(जिमाका): महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने "ग्रामोद्योग भरारी पुरस्कार-2026 साठी नामांकने मागविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. शासकीय योजनांच्या माध्यमातून विशेष करून ग्रामीण भागात यशस्वी उद्योग उभे करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने ही पुरस्कार योजना सुरु केली आहे. यंदा या पुरस्काराचे चौथे वर्ष आहे पुरस्कार योजनेत प्रथम, व्दितीय व तृतीय असे तीन पुरस्कार देण्यात येतात व काही उद्योजकांना उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
संकल्पनेतुन उद्योगाच्या वृध्दीसाठी व उद्योगाला चालना व गती देण्यासाठी सन 2023 पासून राज्यस्तरीय "ग्रामोद्योग भरारी पुरस्कार" सुरु करून माध्यमातून प्रथम, व्दितीय व तृतीय, उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येत आहेत.
मंडळामार्फत शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय घेवून यशस्वीपणे उद्योग उभारणी करून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध केलेल्या मंडळाच्या यशस्वी उद्योजकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे व त्यांचा यथोचित सन्मान व्हावा याकरिता दि.13 जुलै 2026 रोजी पासून महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राज्यस्तरीय ग्रामोद्योग भरारी पुरस्कार 2026 करिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
नामांकन अर्ज मंडळाच्या www.mskvib.org, या संकेतस्थळावर तसेच खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुकांनी आपले नामांकन अर्ज दि.28 जुलै 2026 पूर्वी जिल्हा कार्यालयात पाठवावेत.
अधिक माहितीसाठी संपर्क :- जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, रायगड, जिल्हा उद्योग केंद्र इमारत, ठिकरुळ नाका, रायगड बाजारजवळ, अलिबाग, (दूरध्वनी क्र.02141-222642),मोबाईल क्र.8356051494, ई-मेल आयडी: dvioraigad@mskvib.org, .
000000
Comments
Post a Comment