मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत ‘प्रोजेक्ट आशादीप’ जिल्ह्यात 100 हून अधिक विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन

 

 

रायगड-अलिबाग,( जिमाका) दि.16 : मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 22 जुलै रोजीच्या वाढदिवसानिमित्त  जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरे अंतर्गत ‘प्रोजेक्ट आशादीप राबविण्यात येणार असून, त्याअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हाभरात 100 हून अधिक विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

या उपक्रमांतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी स्तरावर 56, खाजगी संलग्नित रुग्णालयांमध्ये 20, पनवेल महानगरपालिका uhwc,uphc & hbt स्तरावर 28  तसेच विविध स्तरांवर इतर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, एकूण शिबिरांची संख्या 100 पेक्षा अधिक असणार आहे.

आरोग्य शिबिरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची सर्वंकष आरोग्य तपासणी, आवश्यक निदान व उपचार, आयुष्यमान वय वंदना कार्ड व आभा (ABHA) कार्ड नोंदणी, रक्तदान शिबिरे, लेप्टोस्पायरोसिसबाबत जनजागृती, दिव्यांग प्रमाणपत्रांचे वितरण आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

विशेष महाआरोग्य शिबिरांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :22 जुलै – जिल्हा रुग्णालय, अलिबाग, प्राथमिक आरोग्य केंद्र अजिवली (पनवेल) आणि उपजिल्हा रुग्णालय, पनवेल, 24 जुलै उपजिल्हा रुग्णालय, माणगाव, 27 जुलै उपजिल्हा रुग्णालय, रोहा,29 जुलै उपजिल्हा रुग्णालय, श्रीवर्धन.

जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी या आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष,रायगड व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान