अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रि-मॅट्रिक शिष्यवृती नुतनीकरणासाठी पुन्हा संधी


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8- सन 2017-18 वर्षातील अल्पंसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी असलेले प्रि-मॅट्रीक शिष्यवृत्ती नुतनीकरण ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी शाळा,संस्थास्तरावर 30 नोव्हेंबर 2017 या अंतिम मुदतीपर्यंत झाली नव्हती अशा रायगड जिल्ह्यातील 132 विद्यार्थ्यांना  पडताळणीची पुन:श्च संधी देण्यात आली आहे. केंद्रशासनाने अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी यासाठी पडताळणीची पुन:श्च शेवटची संधी उपलब्ध करुन दिली आहे. विद्यार्थ्यां साठी केंद्रशासनाने NSP (National Scholarship Portal) 2.0 वर  सोमवार दि.7 मे ते बुधवार दिनांक 16 मे पर्यंत पुन:श्च् पडताळणी प्रक्रिया  www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर सुरु केली आहे. तरी मुख्याध्यापकांनी आपल्या तालुक्यातील गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती यांचेशी संपर्क साधून विद्याथ्यांची खात्री करावी व दिलेल्या मुदतीत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज पडताळणीची प्रक्रीया पूर्ण करावी.असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांनी केले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज