कातकरी उत्थान जिल्हास्तरीय जनजागृती मेळावाःसहानगोठी येथे 1 हजार 450 जातीचे दाखले व 710 अंत्योदय रेशनकार्ड वितरीत
अलिबाग,जि.
रायगड (जिमाका) दि.20- जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या कातकरी उत्थान अभियानांतर्गत
तालुक्यातील सहानगोठी येथे कातकरी उत्थान जिल्हास्तरीय मेळाव्यात कातकरी बांधवांना
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 1 हजार 450 जातीचे दाखले, 710 अंत्योदय रेशनकार्डचे
वाटप करण्यात आले. यावेळी, जिल्ह्यातील कातकरी, ठाकूर समाजातील आदिवासी समाजाने
विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी शासनाच्या नाविण्य पूर्ण योजनांचा लाभ
घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी,
लिलाधर दुफारे यांनी केले.
आदिम आदिवासी समाज विकास सेवा संस्था वाघोडे व रियांशु
फाऊंडेशन संस्था वरंडेपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश मंगळ कार्यालय सहानगोठी बायपास रोड येथे
आयोजित कातकरी उत्थान जिल्हास्तरीय जनजागृती मेळावा आयोजित
करण्यात आला होता.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी,जिल्हा परिषदेचे उपमुख्य
कार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुके, तहसिलदार सचिन शेजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी
दत्तात्रेय निघोट, गटशिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा, आदिम आदिवासी समाज विकास सेवा
संस्थेचे अध्यक्ष सुरेश नाईक, उपाध्यक्ष चांगू मेंगाळ, रियांशु फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष भगवान नाईक
आदि उपस्थित होते.
कार्यक्रमांनतर कातकरी
बोली भाषेत तयार करण्यात आलेली लघुपट फिल्म संगणीय सादरीकरणाद्वारे उपस्थितांना
दाखविण्यात आली. या कार्यक्रमाला विविध विभागाचे
शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच आदिवासी, बांधव,महिला मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
Comments
Post a Comment