गोवर रुबेला लसीकरण मोहिम जिल्ह्यात आजअखेर 4 लाख 53 हजार बालकांना लसीकरण



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19- भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत मंगळवार दि.27 पासून गोवर रुबेला लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे.  या अभियानात रायगड जिल्ह्यात मंगळवार (दि.18 डिसेंबर)  अखेर जिल्ह्यातील 4 लाख 53 हजार 335  बालकांना गोवर रुबेला लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
 जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त अहवालानुसार काल (मंगळवार दि.18) दिवसाअखेर  जिल्ह्यातील 102 शाळांमध्ये लसीकरण राबविले. यात 20 शाळांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील यंत्रणेमार्फत 1566 विद्यार्थ्यांना तर 82 शाळांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याअखत्यारीतील यंत्रणेमार्फत 13 हजार 87 विद्यार्थ्यांना अशा एकूण 14 हजार 653 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यात 7 हजार 571 मुले व 7 हजार 82 मुलींचा समावेश आहे.  तर मोहिम सुरु झाल्यापासून आज अखेर एकूण 2 लाख 35 हजार 675 मुले  व 2 लाख 17  हजार 660 मुली असे एकूण 4 लाख 53 हजार 335 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, अशी  माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ.सचिन देसाई यांनी दिली आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक