माथेरान संनियंत्रण समितीची बैठक 21 रोजी


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18:- माथेरान इको सेन्सेटिव्ह झोन संनियंत्रण समितीची बैठक शुक्रवार दि.21 रोजी सकाळी 10 वाजता  माथरान नगर परिषदेच्या समिती सभागृह, माथेरान ता.कर्जत, जि.रायगड येथे आयोजित करण्यात आली आहे. या क्षेत्रात करावयाच्या विकास कामांचे प्रस्ताव  तसेच या समितीकडे करावयाच्या तक्रारींसाठी नागरिकांनी आपले अर्ज या समितीचे सदस्य सचिव जिल्हाधिकारी रायगड यांचेकडे तात्काळ सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या संदर्भात भारत सरकारच्या पर्यावरण व वन विभागाकडील दि.4 फेब्रुवारी 2003  च्या अधिसूचनेन्वये रायगड व ठाणे जिल्हयातील एकूण 89 (काही पूर्ण व काही भागत:) गावांचा प्रदेश संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.यात रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पुर्ण  1 व भागत: 19, एकूण- 20,खालापूर तालुक्यातील भागत: 10,पनवेल तालुक्यातील पुर्ण 2 व भागत: 38, एकूण- 40,आणि ठाणे जिल्हा अंबरनाथ तालुक्यातील भागत: 19,अशा एकूण 89 गावांचा प्रदेश समाविष्ट आहे. वरील समाविष्ट गावांची यादी संबंधित तहसिलदारांकडे पहावयास उपलब्ध आहे. या गावामधील जो भाग संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्या क्षेत्रातील कोणतीही विकास कामे सनियंत्रण समितीच्या पूर्व मान्यतेखेरीज करावयाची नाहीत.
 या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या प्रदेशातील सर्व विकास विषयक कामे, सर्व बांधकामे व बांधकामाचे नुतनीकरण, संवेदनशील क्षेत्रात करावयाचे कोणतेही खाणकाम, तसेच भूगर्भातील पाण्याची विक्री. या कामांना सनियंत्रण समितीच्या पूर्व मान्यतेची आवश्यकता आहे. या संदर्भात या समितीकडे कोणास काही तक्रारी करावयाच्या असतील तर त्यांनी  आपले अर्ज जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांचेकडे सपूर्द करावेत. तसेच विकास कामांसाठी सनियंत्रण समितीची मान्यता घेण्याच्या दृष्टीने आपले प्रस्ताव 10 प्रतीत जिल्हाधिकारी रायगड अलिबाग तथा सदस्य सचिव सनियंत्रण समिती यांचेकडे तात्काळ सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी,रायगड अलिबाग यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज