पंतप्रधान सुरक्षा विमा योजना लाभ घेण्यासाठी संपर्क साधावा




अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.31- केंद्र शासनाकडून राबविली जाणारी पंतप्रधान सुरक्षा विमा योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व माजी सैनिक त्यांच्यावर अवलंबून असणा-या अवलंबितांना लागू करण्याचे महाराष्ट्र शासनाकडून प्रस्तावित आहे.  पंतप्रधान सुरक्षा विमा योजने अंतर्गत वार्षिक रुपये 12/- + (सेवाकर) हप्ता असून तो दरवर्षी लाभार्थ्याच्या बँक खात्यातून आपोआप वर्ग होणार आहे.   सदरची रक्कम रूपये 12/- + (सेवाकर) ही  केंद्रशासनाकडून लाभार्थ्याच्या खात्यामध्ये वर्ग करण्याचे संभावित असून, सर्व माजी सैनिक त्यांच्या अवलंबितांनी आपल्या  पेन्शन आकौंटच्या पहिल्या पानाची सुस्प्ष्ट छायांकित प्रत खाते क्रमांक, आय एफ सी कोड   माजी सैनिक ओळखपत्रासह या कार्यालयात जमा करावी असे आवाहन,  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,  रायगड-अलिबाग यांनी केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज