राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील आर्थिक स्तर उंचाविलेल्या शिधापत्रिकाधारकांनी सवलतीच्या दराने मिळणारे अन्नधान्य नाकारण्याचे प्रशासनाचे आवाहन

 


 

अलिबाग, दि.16 (जिमाका):- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना स्वेच्छेने सवलतीच्या दराने मिळणारे अन्नधान्य नाकारण्याचा (GIVE IT UP) पर्याय उपलब्ध करुन देण्यात यावा, याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

जे शिधापत्रिकाधारक राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेचे लाभ मिळण्यास पात्र होते, मात्र कालांतराने त्या शिधापत्रिकाधारकांचे व शिधापत्रिकेतील सदस्यांचे आर्थिक उत्पन्न वाढले व त्यांचा आर्थिक स्तर उंचावला असून आता त्यांचे उत्पन्न अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेच्या उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे अशा शिधापत्रिकाधारकांनी त्यांची शिधापत्रिका अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतून स्वखुशीने बाहेर पडून त्यांच्या उत्पन्नाच्या निकषानुसार त्यांनी केशरी किंवा शुभ्र शिधापत्रिका प्राप्त करुन घेण्यासाठी संबंधित तहसिल कार्यालयात जावून तसा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या GIVE IT UP चा अर्ज भरुन देवून उत्पन्नानुसार केशरी व शुभ्र शिधापत्रिका घ्याव्यात.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारकांनी त्यांच्या संबंधित तहसिल कार्यालयांमध्ये GIVE IT UP चे अर्ज भरुन “अन्नधान्याच्या अनुदान योजनेतून बाहेर पडा (Opt out of subsidy of foodgrains)” या योजनेमध्ये स्वखुशीने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत