पनवेल शासकीय जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम संपन्न

 


 

अलिबाग, दि.5 (जिमाका):- शासकीय आय.टी.आय. पनवेल येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम संपन्न झाला. रायगड जिल्ह्याचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तथा संस्थेचे विद्यमान प्राचार्य के.डब्ल्यू.खटावकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर पनवेलचे उप कोषागार अधिकारी श्री.जाधव, महाड आयटीआयचे प्राचार्य श्री.नलावडे, पनवेल संस्थेचे उपप्राचार्य श्री.व्ही. डि. टिकोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी उप कोषागार अधिकारी श्री.जाधव, महाडचे प्राचार्य श्री.नलावडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करताना सावित्रीमाईंच्या जीवनचरित्रावर आपले विचार व्यक्त केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष अभियान कार्यक्रम स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनुसूचित जातीच्या विविध व्यवसायातील पात्र प्रशिक्षणार्थ्यांना टूल कीट्सचे वाटप करण्यात आले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.खटावकर यांनी उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थीनींना मोलाचे मार्गदर्शन केले. क्रांतीज्योती सावित्रीमाईच्या जीवनचरित्रावर, फुले दांम्पत्याच्या कार्यकर्तृत्वाबाबत माहिती दिली.

कार्यक्रमाची सुरूवात प्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी सावित्रीमाईंच्या जीवन चरित्रावर संस्थेतील प्रशिक्षणार्थीनींनी सुरेल आवाजात ओवी गायली. यावेळी प्रशिक्षणार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.आकांक्षा गावडे हिने केले तर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी श्री.आर. व्ही. शिरसाट यांनी आभारप्रदर्शन केले.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज