करंजा येथे जिल्हा क्षयरोग निर्मूलन कार्यालयाकडून विशेष क्षयरोग निदान व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
अलिबाग,जि.रायगड,दि.03
(जिमाका) :- करंजा मच्छिमार सहकारी सोसायटी, पालवी हॉस्पिटल
उरण आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय उरण यांच्या सहकार्याने (दि.02 जानेवारी 2022)
रोजी विशेष क्षयरोग निदान व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात एकूण 124 रुग्णांची तपासणी करून 19 संशयित
क्षय रुग्णांचे थुंकी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले तसेच 107 रुग्णांना
कोविड लस देण्यात आली.
यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सुरेश
देवकर यांनी मच्छिमार सोसायटीच्या सभासदांना क्षयरोगाची माहिती देऊन त्यांची व त्यांच्या
कुटुंबातील व्यक्तीची तपासणी करण्यासाठी आवाहन केले. जिल्ह्यातील सात तालुक्यात एकूण
84 मच्छिमार सोसायट्या असून त्यांचे जवळपास 35 हजार सभासद आहेत. त्याप्रमाणे त्यांच्या
कुटुंबातील सदस्य किती आहेत, याचा आराखडा तयार करून त्यानुसार त्या कुटुंबातील सदस्यांचे
क्षयरोगाची तपासणी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा
क्षयरोग अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने तसे आदेश देण्यात आले होते.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी तालुका
आरोग्य अधिकारी डॉ. ईटकरे, करंजा मच्छिमार सहकारी सोसायटीचे चेअरमन भालचंद्र नाखवा, पालवी हॉस्पिटलचे डॉ.लहासे, डॉ.पाटील,
डॉ.कोळी, डॉ. जारी, लहान मुलांचे डॉ.अजय कोळी, आरोग्य सेवक श्री.कोळी, पेडणेकर व आशा
कार्यकर्ती, श्री. रितेश पाटील, दिपक धुमाळ व हरेश पाटील, मत्स्य व्यवसाय
विभागाच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी सौ. सोनाली तोडणकर, श्री. गणेश, श्री.सुनील
भोईर या अधिकारी- कर्मचाऱ्यांनीही मोलाचे सहकार्य केले. त्याचप्रमाणे जिल्हा पी.पी.समन्वयक
दंतराव सतीश यांनी त्यांच्याशी समन्वय साधून आयोजन करण्याकरिता मोलाचे कार्य केले.
यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त श्री.सुरेश भारती यांनी जिल्ह्यातील मच्छिमार
सोसायटीच्या याद्या उपलब्ध करून दिल्या, तसेच त्यांनी सोसायटीच्या अध्यक्ष व सचिव यांना या कामासाठी
सहकार्य करण्यास सूचविले.
०००००
Comments
Post a Comment