पिडित, तक्रारदार महिलांनी महिला लोकशाही दिन समितीच्या बैठकीमध्ये तक्रारी अर्ज, निवेदन करावेत

 


          अलिबाग,जि.रायगड, दि.16 (जिमाका) :- महिलांच्या तक्रारी, अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व सामाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीची बैठक प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात येते.

 महिला लोकशाही दिन समितीच्या बैठकीमध्ये पिडित, तक्रारदार महिलांचे केवळ वैयक्तिक स्वरूपाचे अर्ज स्वीकारले जातात. तक्रार, निवेदन दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे.  आवश्यक कागदपत्रे न जोडलेले अर्ज, न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये अर्ज, सेवा विषयक अर्ज, आस्थापना विषयक अर्ज स्वीकारले जात नाहीत.

 या महिला लोकशाही दिन समितीच्या बैठकीमध्ये तक्रारी अर्ज, निवेदन सादर करण्यास इच्छुक असलेल्या महिलांनी जिल्हा महिला व बालकल्याण विकास अधिकारी कार्यालय, घर नं. 738, निलपुष्क, डोंगरी-चेंढरे एमआयडीसी कार्यालयासमोर,अलिबाग (दूरध्वनी क्र.02141-225321) या कार्यालयात तक्रार अर्ज, निवेदन दोन प्रतीत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, श्रीमती उज्वला पाटील यांनी केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज