दि.22 डिसेंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन


 

                 रायगड दि.5(जिमाका) :- रायगड डाक विभागातील टपाल सेवे संदर्भात तक्रार/समस्या निवारण करण्यासाठी अधीक्षक डाकघर रायगड विभाग, अलिबाग यांच्या कार्यालयाद्वारे शुक्रवार, दि.22 डिसेंबर 2023 रोजी सकाळी  11.00 वाजता अधीक्षक डाकघर, अलिबाग  यांच्या कार्यालयात डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती अधीक्षक डाकघर रायगड विभाग श्री.सुनील थळकर यांनी दिली आहे.

          या डाक अदालतीत  रायगड विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार/ समस्या ज्याचे निवारण 6 आठवडा कालावधीत झालेले नाही, अशा टपाल, स्पीडपोस्ट, काऊटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील.      तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा इ. असणे आवश्यक आहे. इछुक ग्राहकांनी आपली तक्रार 2 प्रतीत अधीक्षक डाकघर रायगड विभाग, सुनील थळकर यांच्याकडे दि.21 डिसेंबर 2023 पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन