महाड येथे दिव्यांग मार्गदर्शन मेळावा कार्यक्रम संपन्न
रायगड दि.5(जिमाका) :- जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांचे मार्गदर्शनाखाली 3 डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त संपन्न होणाऱ्या सप्ताहाचे औचित्य साधून महाडचे आमदार भरत गोगावले व दिव्यांग संघटना राज्य अध्यक्ष साईनाथ पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री समर्थ दिव्यांग कल्याणकारी संस्था, महाडच्या वतीने दिव्यांग मार्गदर्शन मेळावा कार्यक्रम संपन्न झाला.
या मेळाव्यास निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.आशिष मिश्रा तसेच ग्रामीण रुग्णालय महाडचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.भास्कर जगताप व सिकलसेल समुपदेशक प्रतिम सुतार, जिल्हा रुग्णालयासमवेत दिव्यांग कल्याणाच्या विविध शासकीय योजनांचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्देशाने अनेक शासकीय विभागातील अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार भरत गोगावले यांनी सांगितले की, शासकीय योजनांवर प्रकाशझोत टाकत योजनांचा लाभ घेताना दिव्यांग बांधवाना येणाऱ्या अडचणी दूर करून त्यांना सहकार्य करावे, अशा सूचना शासकीय विभागांना करत त्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन दिव्यांग बांधवांना केले.
तसेच दिव्यांग संघटना राज्य अध्यक्ष साईनाथ पवार यांनी देखील या विषयी मार्गदर्शन केले. तर महाड ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग बांधवाना तपासणी शिबीर व अन्य सुविधांसंदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ.भास्कर जगताप यांनी मार्गदर्शन केले तसेच उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.
निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.आशिष मिश्रा यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, दि. 3 डिसेंबर 2012 रोजीच्या पासून शासन निर्णयानुसार SADM या संगणकीय प्रणाली द्वारे केवळ 6 प्रकारावरील दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येत होते. परंतु, केंद्र शासनाच्या 28 डिसेंबर 2016 रोजीच्या "दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, कायद्यामध्ये एकूण 21 प्रकारच्या दिव्यांग प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये दृष्टिदोष (अंधत्व), कर्णबधिराता, शारीरिक दिव्यांगता, मानसिक आजार, बौद्धिक दिव्यांग, बहू दिव्यांगता, शारीरिक वाढ खुंटणे (डॉर्फिझम), स्वमगांत (ऑटिझम), मेंदूचा पक्षाघात, स्नायूंची विकृती, मज्जासंस्थांचे जुने आजार,अध्ययन अक्षमता, मल्टीपल स्कालेरॉसिस, वाचा व भाषा दोष, थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकलसेल डिसीज, ऍसिड अटॅक व्हिक्टीम, पार्किनसन्स डिसीज, दृष्टी क्षीणता (लो-व्हिजन), कुष्ठरोग हे प्रकार समाविष्ठ करण्यात आले आहेत. त्यासंबंधित दिव्यांग बांधवानी जिल्हा रुग्णालय अथवा उप जिल्हा व ग्रामीण रुग्णालय येथे याबाबतची अधिक माहिती घ्यावी असे सांगितले.
तसेच सिकलसेल समुपदेशक प्रतिम सुतार यांनी उपस्थितांशी संवाद साधताना दिव्यांग सप्ताहानिमित्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शीतल जोशी घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध ठिकाणी दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन केले असल्याचे सांगितले. दि. 6 डिसेंबर रोजी जिल्हा रुग्णालय, अलिबाग, दि. 7 डिसेंबर रोजी उप जिल्हा रुग्णालय माणगाव, दि.9 डिसेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय महाड, दि.11 डिसेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय श्रीवर्धन, तसेच दि.15 डिसेंबर रोजी उप जिल्हा रुग्णालय श्रीवर्धन येथे शिबिराचे आयोजन केले. असून www.swavlambancard.gov.in
०००००००००
Comments
Post a Comment