महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी “एकरकमी परतावा (OTS)” योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे - जिल्हा व्यवस्थापक श्री.निशिकांत नार्वेकर

अलिबागदि.13 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय (ओबीसी) वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांची उपकंपनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लि., रायगड यांच्यामार्फत विविध कर्ज योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराकरीता अल्प व्याजदराने कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे.

रायगड जिल्ह्यातील ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रकमेत 50% सवलत देण्याबाबतची एकरकमी परतावा (OTS) योजना दि.31 मार्च 2023 पर्यंत राबविण्यात येत आहे. त्यानुसार, महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी एकरकमी परतावा (OTS) योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री.निशिकांत नार्वेकर यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज