महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचे कर्ज प्रस्ताव महादिशा पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने सादर करावेत
रायगड-अलिबाग,दि.28 (जिमाका):- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय रायगड मार्फत सन 2025-26 या अर्थिक वर्षाकरिता पात्र लाभार्थ्याकडून महामंडळ राबवीत असलेल्या विविध योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द लोकांच्या स्वयंरोजगारासाठी अर्थिक सहाय्य व सामाजिक उन्नतीच्या उद्देशाने त्यांच्या सर्वांगीन विकासासाठी हे महामंडळ राबवित असलेल्या योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी भारत शासनाच्या प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजने (PM-AJAY) अंतर्गत या योजनांद्वारे लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे, अर्थिक सक्षमीकरण घडवणारी आणि जीवनमान उंचावणे हा प्रमुख उद्देश या महामंडळाचा आहे.
ही अर्ज प्रक्रिया पुर्णपणे पारदर्शक व ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार असून, इच्छुक लाभार्थ्यांनी या महामंडळाच्या htpp://mpbcdc.maharashtra.gov.
महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
50% अनुदान योजना : एकूण प्रकल्प खर्च : रु. 50,000/-, महामंडळाचे अनुदान : रु. 25,000/- बँकेचे कर्ज : रु. 25,000/- या योजनेद्वारे लघु व्यवसाय ,सुक्ष्म उद्योग व उपजीविकेस पूरक अशा उपक्रमांना चालना दिली जाते.
बीजभांडवल योजना : प्रकल्प खर्च रु. 50,000/- ते रु. 5,00,000/-, महामंडळसहभाग : 20 % ( जास्तीत जास्त रु. 50,000/- अनुदान + बीज भांडवल रु. 50,000/-), बँक सहभाग : 75 % रु. 3,75,000/- ( बँकेच्या विद्यामान व्याजदराने कर्ज) लाभार्थी सहभाग : 5 % रु.25,000/-, कर्ज परतफेडीचा कालावधी : 3 ते 5 वर्ष या योजनेद्वारे उद्योजकता विकसित करण्यासाठी उपयुक्त असुन, लाभार्थ्यांना स्थिर व टिकाऊ व्यवसाय उभारता येतो.
थेट कर्ज योजना : महामंडळामार्फत थेट कर्ज योजने अंतर्गत लाभार्थ्यांना रु. 1,00,000/- पर्यंत कर्ज वार्षिक 4 % व्याजदराने उपलब्ध करुन दिले जाते. ही योजना जलद व सुलभ पध्दतीने अंमलात अणली जाते, ज्यामुळे अल्पावधीतच लाभार्थ्यांना व्यवसाय सुरु करता येतो.प्रकल्पखर्च : रु. 1,00,000/-,महामंडळसहभाग : 50 %, थेट कर्ज रक्कम : 45%, लाभार्थी सहभाग : 5%.
राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकासमहामंडळ ( NSFDC) योजना
एनएसएफडीसी,नवी दिल्ली यांच्या अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी रोजगार व उद्योग क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी विविध येाजना राबविल्या जातात. या योजनांमध्ये रु. 1,40,000/- पासून ते रु.5,00,000/- इतके कर्ज रक्कम देण्याचे प्रवाधान असून एकूण प्रकल्पाच्या 90 टक्के एनएसएफडीसी, नवी दिल्ली यांच्या मार्फत प्राप्त होणार जास्तीत जास्त रु 50,000/- च्या कमाल मर्यादेत अनुदान आहे. व उर्वरीत रक्कम बीज भांडवल स्वरुपात देण्यात येईल.
राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ (NSKFDC) योजना : या योजनां मध्ये रु. 1,00,000/- पासुन ते रु. 15,00,000/- इतके कर्ज रक्कम देण्याचे प्रवाधान असून एकूण प्रकल्पाच्य 90 % एनएसकेएफडीसी नवी दिल्ली यांच्यामार्फत प्राप्त होणार जास्तीत जास्त रु. 50,000/- कमाल मर्यादेत अनुदान आहे उर्वरीत रक्क्म बीज भांडवल स्वरुपात देण्यात येईल.
(NSFDC) योजना (NSKFDC) शैक्षणिक कर्ज योजना : या योजनांमध्ये रु.10,00,000/- पासून ते रु. 30,00,000/- इतके कर्ज रक्कमेचे प्रवाधान राष्ट्रीय व अंतराष्ट्रीय प्रमाणे महामंडळाच्या नियम, अटी व शर्तीप्रमाणे आहे.
अर्ज करण्यास आवश्यक पात्रता : अर्जदार अनुसूचित जातीचा व नवबौध्द संवर्गातील असावा व त्याचे वय 18 ते 50 वर्षे असावे. वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी रु. 3.00 एवढी आहे. अर्जदार हा या महामंडळाच्या योजनांचा व इतर वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
अर्ज करण्यास आवश्यक कागदपत्रे : जातीचा व उत्पन्नाचा सक्षम अधिका-यांनी दिलेला दाखला. 5 पासपोर्ट आकाराचे फोटो.
रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड प्रत. कोटेशन व व्यवसायासाठी असलेल्या आवश्यक असलेल्या जागेचा पुरावा, व्यवसायानुसार इतर दाखले. आवश्यकते प्रमाणे प्रकल्प अहवाल. बँकखाते क्रमांक पासबुकची झेरॉक्स प्रत.
सर्व योजनांची सविस्तर माहिती, अर्ज प्रकिया, आवश्यक कागदपत्रांची यादी व पात्रतेच्या अटी महामंडळाच्या महादिशा पोर्टलवर उपलब्ध आहेत. इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी माहिती नीट वाचून घेणे आवश्यक आहे.
००००००००
Comments
Post a Comment