हिंदू खाटीक समाजातील लोकांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीच्या सर्वांगीण विकासासाठी स्वयंरोजगाराच्या विविध कर्ज योजना

 

 

रायगड-अलिबाग,दि.28 (जिमाका):- राज्यातील अनुसूचित जातीतीत हिंदू खाटीक समाज आर्थिक महामंडळाची स्थापना दि.05 जून 2025 रोजी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ अंतर्गत उपकंपनी म्हणून करण्यात आली आहे.  हिंदू खाटीक समाज आर्थिक महामंडळ मर्या.,(उपकंपनी) मार्फत हिंदू खाटीक समाजातील लोकांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीच्या उद्देशाने त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वयंरोजगाराच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात.

        50 टक्के अनुदान योजना :- प्रकल्प मर्यादा रु. 50,000/- पर्यंत.   प्रकल्प मर्यादेच्या 50 टक्के  किंवा जास्तीत जास्त 25,000/- पर्यत अनुदान देण्यात येते व उर्वरीत रक्कम बँकेमार्फत देण्‍यात येते. बँक कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते. कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे 3 वर्षात करावयाची आहे.

बीज भांडवल योजना :- प्रकल्पमर्यादा रु. 50,001/- ते रु. 5 लाखापर्यंत. प्रकल्प मर्यादेच्या 20 टक्के  बीज भांडवल कर्ज महामंडळामार्फत 4 टक्के द.सा.द.शे.व्याजदराने देण्यात येते. या राशीमध्ये महामंडळाचे अनुदानाचा प्रकल्प मर्यादेच्या 50 टक्के  किंवा जास्तीत जास्त 50,000/- पर्यत समावेश आहे. बँकेचे कर्ज 75 टक्के देण्यात येते व या कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येतो. महामंडळाचे व बॅंकेच्या कर्जाची  परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार 3 ते 5 वर्षाचे आत करावी लागते.अर्जदारास 5 टक्के स्वत:चा सहभाग भरावयाचा आहे.

            थेट कर्ज योजना :- प्रकल्प मर्यादा रु. 1,00,000/- पर्यंत .प्रकल्प मर्यादेच्या 50%  किंवा         जास्तीत जास्त 50,000/- पर्यत अनुदान देण्यात येते व उर्वरीत रक्कम     रु. 50,000/- महामंडळामार्फत4 द. सा.  द. शे. व्याजदराने देण्यात येते. कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे 3 वर्षात करावयाची आहे.

            एनएसएफडीसी योजना :- प्रकल्प मर्यादा रु. 1,40,000/- ते    रु.2,00,000/-पर्यंत .एकुण प्रकल्पाच्या 90% एनएसएफडीसी, नवी दिल्ली यांच्या मार्फत प्राप्त होणार जास्तीत जास्त  रु 50,000/- च्या कमाल मर्यादेत अनुदान आहे व उर्वरीत रक्कम बीज भांडवल स्वरुपात देण्यात असेन. अर्जदाराचा कोणत्याही रुपात उल्लेख नाही.

अर्ज करण्यास आवश्यक पात्रता :- अर्जदार अनुसूचित जातीतील हिंदू खाटिक संवर्गातील असावा व त्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. राज्य महामंडळाच्या योजनेकरता वार्षिकउत्पन्न मर्यादा शहरी व ग्रामीण भागाकरिता रु. 3 लाख इतकी आहे.  अर्जदार हा महामंडळाच्या कोणत्याही योजनांचा (राज्य / केंद्र) थकबाकीदार नसावा. अर्ज करण्यास आवश्यक कागदपत्रे (1) जातीचा व उत्पनाचा सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला दाखला. 5 पासपोर्ट आकाराचे फोटो.(3) रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र,रहिवाशी प्रमाणपत्र, आधारकार्ड प्रत,पॅनकार्ड, कोटेशन, व्यवसायासाठी आवश्यक असल्यास जागेचा पुरावा, व्यवसायानुरुप इतर आवश्यक दाखले. आवश्यतेप्रमाणे प्रकल्प अहवाल.व्यवसायानुरुप आवश्यकतेप्रमाणे इतर दाखलेपत्र, उदा. वाहनाकरीता व व्यवसायाकरिता लायसन्स, परमिट, बेंज नंबर इत्यादी. बँकेचे खाते क्रमांक व पासबुकची झेरॉक्स.

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत