महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिन मुख्य शासकीय समारंभ सकाळी आठ वा.


अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.26- महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 वा वर्धापन दिनानिमित्त रायगड जिल्हास्तरीय मुख्य शासकीय समारंभ  मंगळवार दि.1 मे रोजी अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर सकाळी 8 वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न ,नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते  मुख्य शासकीय ध्वजारोहण  कार्यक्रम होणार आहे. यावेळी राष्ट्रध्वज वंदन, संचलन ही होणार आहे. या मुख्य सोहळ्यास सर्व नागरिकांना उपस्थित राहता यावे यासाठी मुख्य शासकीय समारंभ राज्य भर एकाच वेळी सकाळी आठ  वा. आयोजित करण्यात आला आहे. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ आयोजित करावासा वाटल्यास त्यांनी तो सकाळी सव्वा सात वाजण्यापूर्वी किंवा सकाळी नऊ वाजेनंतर करावा. जास्तीत जास्त व्यकतींना या मुख्य शासकीय समारंभात सहभागी होता यावे यासाठी सकाळी सव्वा सात ते 9 वा.दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करु नये.  असे शासनाने परिपत्रकाद्वारे सूचित केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज