जागतिक हिवताप दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम


अलिबाग, जि. रायगड, (जिमाका) दि.25- जागतिक हिवताप दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हिवतापासंदर्भात जनजागृतीसाठी प्रभातफेरी, किटकजन्य आजारांचे प्रदर्शन करण्यात आले.
 या कार्यक्रमासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.देसाई, डॉ.फुटाणे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.पाटील मॅडम, हिवताप पर्यवेक्षक नांदेडकर, वर्तक व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
डासांमार्फत पसरणारे विविध आजारांमध्ये पूर्वी केवळ हिवताप (मलेरीया) हा आजार सर्वज्ञात होता. परंतु आता डासांमार्फत पसरणारे विविध आजार जनतेस भेडसावू लागले आहेत. डेंग्यू, चिकुनगुनिया, जापनीज मेंदूज्वर, हत्तीरोग इत्यादी आणि या आजारांवर वेळीच उपचार न घेतल्यास नागरीकांचे आरोग्य धोक्यात येते. प्रसंगी त्यांचे प्राणही जाऊ शकतात. डासांमार्फत पसरणारे आजार पावसाळ्यात डासोत्पत्ती वाढल्याने वाढू शकतात. त्यामुळे पावसाळा सुरु होण्यापूर्वीच अशा आजारांबाबत जनजागृती होण्यासाठी 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षाचे घोषवाक्य आहे, 'तयारी हिवतापास हरवण्याची' या घोषवाक्यानुसार आरोग्य विभागामार्फत किटकजन्य आजारांवर नियंत्रणासाठी विविध उपाययोजना राबविल्या जातात. त्यास नागरीकांची उत्तम साथ मिळाली तर नक्कीच किटकजन्य आजारांवर नियंत्रण आणणे व आजारांना हरविणे शक्य होणार आहे. या संदर्भात उपस्थितांना माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज