अनधिकृत शाळांची यादी जाहीर



अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.27:- शासनाच्या परवानगी शिवाय रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी अनधिकृत शाळा सुरु आहेत. अशा अनधिकृत शाळा शैक्षणिक वर्ष 2017-18 या मध्ये शासनाची परवानगी प्राप्त झाल्याशिवाय संबंधित संस्थांनी सुरु करु नयेत. अशा अनधिकृत प्राथमिक शाळा सुरु असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित गट शिक्षणाधिकारी यांनी RTE-2009 च्या कायद्याप्रमाणे व याबाबतच्या महाराष्ट्र शासन नियमावली 2011 नुसार उचित कार्यवाही करावी. पालकांनी आपल्या पाल्यांस अशा शाळांना मान्यता नसल्यामुळे प्रवेश घेवू नये. अन्यथा अनधिकृत शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा अन्य मान्यता प्राप्त प्राथमिक शाळेतून घेतली जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान  झाल्यास त्यास पालकच जबाबदार राहतील याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शेषराव बढे, यांनी केले आहे. शिक्षण विभागाने दिलेली जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची यादी याप्रमाणे-
अनधिकृत शाळांची नावे पुढीलप्रमाणे-
पाली- रुता गावंड संस्था लिटील वंडर्स स्कूल परळी,
रोहा-1)रायगड एज्युकेशन सोसा.इग्लिश मिडियम स्कूल खूटल., 2)ज्ञानांकुर इंग्लिश मिडियम स्कूल खांब
उरण- सेंट स्टिफन्स स्कूल, दास्तान फाटा,जासई.,
पेण-ट्री हाऊस हायस्कूल,कॅनल रोड पेण.
मुरुड-मॉर्निंग स्टार प्रा. स्कुल, सर एस.ए. रोड, मुरुड.,
अलिबाग-श्री लक्ष्मीनारायण प्राथमिक विद्यामंदीर,बहीरोळे, मापगांव अलिबाग.
कर्जत- 1)सोमय्या इंग्लिश स्कूल नेरळ, 2)सुंदर इंग्लिश मिडियम स्कूल तिवरे, 3)फैज इंग्लिश स्कूल, दामत., 4)शबनम सैय्यद इंग्लिश स्कूल, कर्जत.
पनवेल- 1)प्लेजंट इंग्लिश स्कूल नेरेपाडा,2)शारदादेवी इंग्लिश मिडियम स्कूल आदई., 3)एस.ई.ए. अँड वुय ट्रस्ट मा आशा हिंदी स्कूल सुकापूर, 4)गिरीराज सिंग सोलंकी पब्लिक स्कूल, लोनीवली, 5)प्लेजंट इंग्लिश मिडियम स्कूल प्रायमरी अँड प्रायमरी सांगाडे.,6) न्यू व्हिजन स्कूल ऑफ ॲकॅडमीक, पारगांव., 7)एकलव्य न्यू इंग्लिश स्कूल ओवळे, 8)लिटल चॅम्प इंग्लिश मिडियम स्कूल ओवळे, 9)लेट.चांगुणाबाई ज्ञानदकव ठाकूर एज्युकेशन सोसा.प्रायमरी स्कूल उलवा., 10)आरोसे इंटरनॅशनल स्कूल, वहाळ, 11)पराशक्ती इंग्लिश मिडियम स्कूल कोपरा., 12)होली स्पीरीट इंग्लिश मिडियम स्कूल आपटे., 13)ह.भ.प.श्री.दामजी गणपत गोवारी विद्यालय कामोठे प्राथमिक इंग्लिश कामोठे, 14)अलसफा इंग्लिश स्कूल तळोजा, 15) कळसेकर इंग्लिश मिडियम स्कूल पनवेल. 16)वेदांत पब्लिक स्कूल पनवेल कळंबोली, 17)डॉ.ए.जी.जे.अब्दुल कलाम इंटरनॅशनल स्कूल  सी.बी.एस.सी. 18)डॉ.ए.जी.जे.अब्दुल कलाम इंटरनॅशनल स्कूल  स्टेट बोर्ड पनवेल.
 महाड-कै.सिताराम शिवराम कदम मराठी मिडियम स्कूल बिरवाडी,
म्हसळा- 1)अल हैसान इंग्लिश स्कूल म्हसळा.,2)इकरा इस्लामिक स्कूल अँड मकतब, म्हसळा, 3)न्यू इंग्लिश स्कूल, लिपणी वावे, 4)डॉ. ए.आर.उंड्रे स्कूल, मेदडी,.
 अशा एकूण 34 अनधिकृत शाळांची यादी  जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी जाहीर केली असून त्यात पालकांनी आपल्या पाल्यास प्रवेश देऊ नये असे आवाहनही केले आहे.
०००००


Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज