रेशन कार्ड धारकांनी 31 मार्च पूर्वी ई-केवायसी करणे अनिवार्य
रायगड (जिमाका) दि.26 : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी ई-केवायसी करणे शासनाने अनिवार्य केले आहे. यासाठी 31 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी सर्वांनी तात्काळ ई-केवायसी करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
राज्यातील रेशन कार्ड धारकांना घरबसल्या ई-केवायसी करण्यासाठी अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच, जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदारही शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. नागरिकांनी याचा लाभ घ्याव.
रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये 30.92% लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही. सुरुवातीला 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र नागरिकांच्या सोयीसाठी ती वाढवून 31 मार्चपर्यंत करण्यात आली आहे. संबंधित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा त्यांना रेशनचे धान्य मिळण्यमध्ये अडचण येऊ शकते.
अनेक कार्डधारकांना अंगठ्याचे स्कॅनिंग ई-पॉस मशीनवर होत नसल्यामुळे त्रास होत होता. आता त्यावर तोडगा म्हणून ई-पॉस मशीनवर डोळे स्कॅन करून ई-केवायसी पूर्ण करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी केले आहे.
मेरा ई-केवायसी अॅप
लाभार्थ्यांना खालील दोन अॅप्स डाउनलोड करावे लागतील
१. मेरा ई-केवायसी अॅप
२. आधार फेस आरडी सर्व्हिस अॅप
खालील लिंक्सवरून अॅप्स डाउनलोड कराः
मेरा ई-केवायसी मोबाईल अॅप
https://play.google.com/store/
आधार फेस आरडी सर्व्हिस अॅप
https://play.google.com/store/
000000
Comments
Post a Comment