किहीम येथे महा श्रमदान मोहीम कार्यक्रम संपन्न

 

 

रायगड(जिमाका)दि.01:- स्वच्छता ही सेवा अभियान  अंतर्गत  जिल्ह्यात  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड व उप मुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभाग श्रीमती शुभांगी नाखले  यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून स्वच्छतेचे विविध उपक्रम होत आहेत. स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या बाबिस अनुसरून ग्रामपंचायत किहीम ता.अलिबाग येथे ग्रामस्थ, एन.एस.एस चे विद्यार्थी, लायन्स क्लबचे सदस्य व माणुसकी प्रतिष्ठानचे सदस्य, रायगड जिल्हा परिषदेचे अधिकारी  व कर्मचारी यांच्यासंयुक्त विद्यमाने महाश्रमदान मोहीम उत्साहात संपन्न झाली.      

     यावेळी किहिमचे सरपंच शांत गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले प्रत्येकाने स्वच्छता सवयी अंगी कारून आपले घर,परिसर गाव स्वच्छ ठेण्यास कायमस्वरूपी  प्रयत्न करावा. किहीम ग्रामपंचायत हद्दीत स्वच्छता राहण्यासाठी किहीम ग्रामपंचायत सतत कार्यरत असते. स्वच्छता अभियानामुळे आरोग्य मान उंचावून सर्वांची प्रगती होणार आहे.

जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड म्हणाले स्वच्छता प्रेमी नागरिक विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करतील. विद्यार्थी  स्वच्छता अभियानात महत्वाची भूमिका बजावू शकतात. स्वच्छता ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. स्वच्छ गाव समृद्ध गाव  समृध्द भारत करण्यासाठी प्रयत्नशील राहू या ती काळाची गरज आहे. डॉ.राजाराम हुलवान यांनी स्वच्छतेची शपथ दिली

यावेळी किहीमचे उपसरपंच मिलिंद पडवळ, संवाद तज्ञ सुरेश पाटील, ग्रामविकास अधिकारी बाबुराव वणवे, माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ.राजाराम हुलवान, लायन्स क्लब मांडवा अध्यक्ष  जितेंद्र पाटील, वडके महाविद्यालय एन एस एस चे 100 विद्यार्थी व विद्यार्थिनी  तसेच एन.एस.एस समन्वयक प्रा.प्रवेश पाटील. प्रा.सचिन गोंधळी.अलिबाग गट समन्वयक श्रीमती  इच्छ्या नाईक, तेजस्विनी फाउंडेशन चे अध्यक्षा श्रीमती जीविता पाटील, सुधाकर निषाद  व  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक