पनवेल व उरण पंचायत समिती कार्यक्षेत्रामध्ये भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे मनाई आदेश जारी


 

रायगड-अलिबाग,दि.16(जिमाकामा.राज्य निवडणूक आयोगाने दि.13 जानेवारी 2026 रोजीचे अधिसुचनेनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक सन-2026 करीता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामधील रायगड जिल्हा परिषद अंतर्गत पनवेल व उरण पंचायत समिती कार्यक्षेत्रामध्ये दि. 16 जानेवारी 2026 रोजी पासून दि.21 जानेवारी 2026 रोजी पर्यत निवडणुक कार्यक्रमांनुसार उमेदवार किंवा त्यांच्या कोणत्याही सुचकाकडून नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात येणार आहे. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दि.27 जानेवारी 2026 आहे. त्याअनुषंगाने, विविध राजकीय पक्ष नामनिर्देशन पत्र सादर करतेवळी उमेदवारांच्या समर्थनार्थ शक्ती प्रदर्शन करणे, विविध वाहनांचा वापर करणे, घोषणाबाजी करणे यामुळे किरकोळ कारणावरून वाद निर्माण होवून पक्ष कार्यकर्त्यामध्ये असंतोषाचे वातावरण तयार होते तसेच रहदारीच्या नियमनात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून सार्वजनिक शांततेचा भंग होण्याची शक्यता आहे.

त्याकरिता पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई रश्मि नांदेडकर यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामधील रायगड जिल्हा परिषद अंतर्गत पनवेल पंचायत समिती कार्यक्षेत्रामध्ये तहसिलदार कार्यालय, जुना ठाणा नाका रोड, साईनगर, पनवेल, जि. रायगड व उरण पंचायत समिती कार्यक्षेत्रामध्ये प्रकल्पग्रस्त सिडको प्रशिक्षण केंद्र, सेक्टर नं. 30, बोकडविरा, उरण, जि.रायगड यांच्या कार्यालयाचे 100 मीटर परिक्षेत्रात पुढीलप्रमाणे बंदी आदेश जारी केला आहे.

नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी जात असताना उमेदवारांना फक्त दोन वाहने घेवून जाता येतील. कोणताही प्रचार करण्यास, सभा घेण्यास, कोणतीही घोषणाबाजी करण्यास मनाई करण्यात येत आहे. ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास मनाई करण्यात येत आहे.. कोणताही मजकूर लिहिण्यास अगर छापील मजकूर चिटकवण्यास मनाई करण्यात येत आहे. उमेदवार नामनिर्देशन पत्र दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात उमेदवारांसोबत दोन व्यक्ती यांच्या व्यतिरीक्त कोणत्याही व्यक्तीस जाण्यास मनाई करण्यात येत आहे.

हा आदेश दि.13 जानेवारी 2026 रोजी 00.01 वा. पासून ते दि.27 जानेवारी 2026 रोजीचे 24.00 वा. पर्यंत अंमलात राहील.

या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान