पाचाड येथे राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा 427 वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

 

 

रायगड-अलिबाग,दि.12(जिमाका) :रायगड जिल्हा परिषद आणि पाचाड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक किल्ले रायगड च्या पायथ्याशी असलेल्या राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या 427 व्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन पाचाड येथील समाधीस्थळी करण्यात आले होते. यावेळी रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकासमंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन,अभिषेक व महाआरती करण्यात आली.

या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, उपविभागीय अधिकारी महाड पोपट ओमासे, तहसीलदार महेश शितोळे, गटविकास अधिकारी डॉ.स्मिता पाटील, माजी जि.प सदस्या मानसी दळवी, पाचाड सरपंच सीमा बेंदुगडे यांसह विविध अधिकारी, ग्रामस्थ, विद्यार्थी तसेच  विविध शिवभक्त संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

०००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन