रायगडचा राज्य क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा


रायगड-अलिबाग,दि.16(जिमाका) :-स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलंपिक पदक विजेते म्हणून ज्यांचा संपूर्ण भारताला अभिमान आहे असे महाराष्ट्राचे सुपुत्र दिवंगत खाशाबा जाधव यांनी ऑलंपिक मध्ये केलेल्या कामगिरीचा गौरव व नवोदित खेळाडूंना दर्जेदार कामगिरी करण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांचा जन्मदिन दि.15 जानेवारी, हा राज्य क्रीडा दिन म्हणून मुख्य समारंभ नवी मुंबई पोलीस मुख्यालय कळंबोली पनवेल येथील मैदानात तर रायगड मध्ये विविध ठिकाणी साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे तीनवेळचे महाराष्ट्र केसरी  विजय चौधरी, उपायुक्त नवी मुंबई पोलीस मुख्यालय, शिवछत्रपती संजय कड्डू टेबल टेनिस, सुर्यकांत ठाकूर, कबड्डी, ऋषिकेश मालोरे वुशू, श्रेयस वैद्य वॉटरपोलो यांच्यासह राजाराम कुंभार खेलो इंडीयाचे मुख्य प्रशिक्षक, समीर रेवाळे, क्रीडा समन्वयक पनवेल महानगरपालिका, सोनार सर रायगड हॉकी संघटना व्यासपीठावर उपस्थित होते

विविध खेळातील 80 खेळाडूंचा ज्यांनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पदक प्राप्त केले आहेत अशk खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. आजच्या सत्कार कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये म्हणजे खेळाडूंचा सत्कार हा माजी खेळाडू आणि ज्यांना राज्याचा सर्वोच्च असा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त आहे त्यांच्या हस्ते करण्यात आला.

 जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रास्तावीकामध्ये शासनाच्या बदलत्या धोरणानुसार खेळाडूंना क्रीडा सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहेत, शासकीय नौकऱ्यांमधील आरक्षण, थेट नियुक्ती इ. केवळ क्रीडा स्पर्धाच्या अच्युत्त कामगिरीच्या बळावर सोप्या झाल्या आहेत. मिशन लक्ष्यवेध ह्या शासनाच्या महत्तवाकाक्षी योजनेचे स्वरुप पटवून दिले. संजय कडू यांनी क्रीडा स्पर्धांची सुरुवात मॅरेथॉन पासून कशी झाली आणि पुढे याचा विस्तार ऑलिंपिक किंवा जागतीक स्पर्धांपर्यंत कसा झाला याचे उत्तम उदाहरण दिले. महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांनी त्यांचे अनुभव सांगताना क्रिकेट खेळाची आवड असतांना वडीलांच्या प्रोत्साहनामुळे कुस्ती खेळात उतरुन अपार मेहनतीने महाराष्ट्र केसरी किताब प्राप्त करता येऊ शकला. आई वडीलांचे मार्गदर्शन आणि पाठींबा असेल तर तुम्ही नक्कीच मोठे खेळाडू बनू शकाल. श्रेयस वैद्य आणि ऋषिकेश मालोरे यांनी सुध्दा शिवछत्रपती पुरस्कार मिळविण्यासाठी किती मेहनत, जिद्द आणि चिकाटी मनाशी असावी लागते यांचे अनुमय कथन केले.

निळकंठ आखाडे यांनी उत्कृष्ट सुत्रसंचलन करतांना आलेल्या खेळाडूंचे मनोगत व्यक्त करतांना त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी खेळाडूकडे खेळाबरोबरच प्रेक्षकांसमोर बोलण्याची क्षमता असणे गरजेचे आहे त्याने खेळण्यातला आत्मविश्वास वाढीबरोबरच सर्वसामान्य गोष्टींचे ज्ञान वाढणे गरजेचे असते. मनोगत व्यक्त करतांना 7 वर्षाची चिमुकली सारा जिने जलतरणात अवघ्या 7 व्या वर्षी खाडी पोहूण जाण्याचे अनेक विक्रम केले अनेक खेळाडूनी आपले मनोगत व्यक्त करतांना पालकाचे आणि उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. उपस्थित मान्यवरांनी हा उपक्रमाचे खुप छान आणि नीटनेटके नियोजन केल्याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ व त्यांचे सर्व सहकाऱ्यांचे विशेष आभार मानले संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संपत्ती येळकर एनआयएस. कोच कुस्ती आणि त्यांचे प्रशिक्षणार्थी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे सुचिता ढमाले, संदीप गुरव, देविदास पाटील, अमोल शेळके, पोर्णीमा सकपाळ आणि केले. शेवटी आभार प्रदर्शनाने प्रशांत यांनी सर्वांची मने जिंकून कार्यक्रमाची यशस्वी सांगता केली.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान