कोकण विभागातील ड्रोनद्वारे फवारणीचे माणगाव येथे प्रात्यक्षिक संपन्न

 


अलिबाग,दि.21 (जिमाका):- कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा माणगाव व डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि.20 सप्टेंबर रोजी कृषी संशोधन केंद्र रेपोली ता.माणगाव येथे कोकण विभागातील ड्रोनद्वारे फवारणी चे  पहिले प्रात्यक्षिक घेण्यात आले.

 यावेळी विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणे अंकुश माने व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले  उपस्थित होत्या.

 यावेळी बायर क्रॉप सायन्स कंपनीचे प्रमुख सुशील देसाई, श्री.खांबेटे व सर्व टीम यांनी ड्रोनद्वारे फवारणी चे प्रात्यक्षिक करुन दाखविले. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून तयार केलेल्या ड्रोनद्वारे फवारणी कशी फायदेशीर आहे, मजूरांवर अवलंबून न राहता ड्रोनद्वारे फवारणीचा पर्याय वापरावा, असे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी दापोली कीटकशास्र विभागाचे डॉ.नरेंगलकर यांनी कीटकनाशक फवारणी करताना काय काळजी घ्यावी, याबद्दल मार्गदर्शन केले. ड्रोनद्वारे फवारणी करताना 5-7 मिनिटांमध्ये  एक एकर क्षेत्रावर फवारणी करण्यात आली.  कर्जत कीटकशास्र विभागाचे डॉ.जळगावकर, संशोधन संचालक शिवराम भगत यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी माणगाव आनंद कांबळे, डॉ.दडेमाल, माणगाव तालुका कृषी अधिकारी             आ.डी.पवार तसेच तालुक्यातील 85 प्रगतशील शेतकरी, कलिंगड, कारली व भाजीपाला उत्पादक शेतकरी आणि महाड, पाली, तळा, रोहा येथील कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते,

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक