अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या प्रि-मॅट्रिक व बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेचे ऑनलाईन अर्ज 30 सप्टेंबर पूर्वी भरावेत

 

अलिबाग,दि.22 (जिमाका):-  शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्याक समाजातील इयत्ता 1 ली ते 10 वी या वर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता यावा यासाठी नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज तसेच इयत्ता 9 वी ते 12 वी मधील फक्त मुलींसाठी असलेल्या बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता यावा यासाठी नवीन विद्यार्थीनींचे ऑनलाईन अर्ज दि.30 सप्टेंबर 2022 पूर्वी भरण्याचे आवाहन शिक्षण संचालक श्री.कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.

मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी आणि जैन या धार्मिक अल्पसंख्यांक समाजातील आर्थिक दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांनी www.scholarship.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन संचालक श्री.पाटील यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज