मधमाशा पालन व्यवसाय जनजागृतीकरिता दि.27 सप्टेंबर रोजी मोफत प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन
अलिबाग,दि.22 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, विशेष घटक योजना राबविल्या जातात. या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील गरजू सुशिक्षित बेरोजगार, बलुतेदार, फळ बागायतदार, यांच्या कौशल्यास वाव देण्यासाठी, अर्थसहाय्य देणे, तयार मालाच्या विक्रीस मदत अशा प्रकारचे सहाय्य शेतकऱ्यांना, व्यावसायिकांना केले जाते. याबाबतच्या मोफत प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन दि.27 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता मु.पो.वारे, ता.कर्जत, जि.रायगड येथे करण्यात आले आहे.
मध केंद्र योजनेंतर्गत शेतकरी फळबागायतदार यांच्या शेतमालाचे परागीभवनामुळे 40 टक्के पर्यंत कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी पूरक उद्योग स्थापनेसाठी साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूकीद्वारे उद्योग स्थापन करता येतात. याकरिता 10 व 20 दिवसांचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. वाया जाणाऱ्या जंगल व फळबागायतीच्या फुलोऱ्यामुळे मधमाशा पाळून निसर्गाचे संरक्षण व संवर्धनासाठी तसेच त्यातून मिळणाच्या मध, मेण, विष, पराग इ. उप उत्पादने मिळू शकतात.
याबाबत सविस्तर माहिती प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचवावी, यादृष्टीने दि.27 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता मु.पो.वारे, ता.कर्जत, जि.रायगड येथे जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून तालुक्यातील व परिसरातील शेतकरी, फळबागायतदार, बचतगटांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नित्यानंद पाटील व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळय्या यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment