राज्यस्तरापर्यंत शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनास शासनाची मान्यता

 


 

अलिबाग,दि.21 (जिमाका):- कोविड-19 प्रादूर्भावामुळे सन 2020-21 व 2021-22 या कालावधीत शालेय क्रीडा स्पर्धांचे तालुकास्तर ते राष्ट्रीयस्तर आयोजन होऊ शकले नव्हते. सन 2022-23 या वर्षात भारतीय शालेय खेळ महासंघद्वारा राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत अनिश्चितता दिसून येत असल्याने राज्यातील विविध खेळ प्रकारातील खेळाडूंना विविध प्रकारांमध्ये राज्यस्तरापर्यंतच्या क्रीडा स्पर्धांमधील सहभागाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यस्तरापर्यंतच्या शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनास शासनाने दि.16 सप्टेंबर 2022 रोजी मान्यता दिली आहे.सन 2022-23 मध्ये शासनाने मान्यता दिल्यानुसार एकूण 93 खेळ प्रकारांचे आयोजन राज्यस्तरावर करण्यात येणार आहे.

या खेळांमध्ये पुढील खेळ प्रकारांचा समावेश आहे :-

अनुदानित व क्रीडा गुण सवलत अनुज्ञेय असलेले खेळ- आर्चरी, ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉल बॅडमिंटन, बेसबॉल, बास्केटबॉल, बॉक्सिंग, कॅरम, बुद्धिबळ, क्रिकेट, सायकलिंग, डॉजबॉल, तलवारबाजी, फूटबॉल, जिम्नॅस्टिक, हँडबॉल, हॉकी, ज्युदो, कबड्डी, कराटे, खो-खो, किक बॉक्सिंग, लॉन टेनिस, मल्लखांब, नेहरू हॉकी नेटबॉल, रायफल शूटिंग, रोलबॉल, रोलर स्केटिंग व रोलर हॉकी, शूटिंग बॉल, शिकई मार्शल आर्ट, सॉफ्टबॉल, सुब्रतो मुखर्जी फुटबॉल, जलतरण व वॉटरपोलो, टेबल टेनिस, तायक्वांदो, थ्रोबॉल, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, वुशू, योगासन, रग्बी, मॉडर्न पेंटॅथलॉन, सेपक टकरा, सॉफ्ट टेनिस, आट्या- पाट्या.

विना अनुदानित व क्रीडा गुण सवलत अनुज्ञेय नसलेले खेळ - आष्टे डो आखाडा, युनिफाईट, कुडो, स्पीडबॉल, टेग सु डो, फिल्ड आर्चरी, मॉन्टेक्सबॉल क्रिकेट, मिनीगोल्फ, सुपर सेवन क्रिकेट, बेल्ट रेसलिंग, फ्लोअरबॉल, थायबॉक्सिंग, हाफकीडो बॉक्सिंग, रोप स्किपिंग, सिलमबम, वुडबॉल, टेनिस बॉल क्रिकेट, टेनिस व्हॉलीबॉल, थांग ता मार्शल आर्ट, कुराश, लगोरी, रस्सीखेच, पॉवरलिफ्टींग, बीच व्हॉलीबॉल, टार्गेटबॉल, टेनिस क्रिकेट, जित कुने दो, फुटसाल, कॉर्फबॉल, टेबल सॉकर, हुप क्वॉन दो, युग मुन दो, वोवीनाम, ड्रॉप रो बॉल, ग्रॅपलिंग, पेन्टाक्यु, लंगडी, जंपरोप, स्पोर्ट डान्स, चॉकबॉल, चॉयक्वांदो, फुटबॉल टेनिस, बुडो मार्शल आर्ट, म्युझिकल चेअर

या विनाअनुदानित 44 खेळांच्या एकविध खेळ संघटनांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे, विहित शुल्क जमा करुन स्पर्धांच्या आयोजनाबाबतचे नियोजन करावे. ज्या विनाअनुदानित 44 खेळांच्या एकविध खेळ संघटना या बाबींची पूर्तता करणार नाहीत, त्या खेळाच्या क्रीडा स्पर्धांचे आयेाजन केले जाणार नाही, याची संबंधित खेळ संघटनांनी नोंद घ्यावी. तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी दिली आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक