मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत 108 प्रकरणांना बँकेची मंजूरी

 

अलिबाग,दि.22 (जिमाका):- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग या अंमलबजावणी यंत्रणेस रायगड जिल्ह्याकरिता 800 प्रकरणांचे उद्दिष्ट वाटप करण्यात आलेले आहे. या योजनेंतर्गत एकूण 108 प्रकरणांना बँकेची मंजूरी मिळाली असून त्यातील प्रकल्प किंमत रक्कम रु.173.88 लाख इतका आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षात अमलबजावणी यंत्रणेद्वारे एकूण 740 प्रकरणे जिल्हा कार्यबल समितीच्या मंजूरीद्वारे बँकेकडे शिफारस करण्यात आली आहेत.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात सन 2019 पासून अद्यापपर्यंत एकूण 157 प्रकरणात प्रत्यक्ष अनुदान वाटप करण्यात आले असून त्यातील अनुदान रक्कम रु.331.85 लाख इतकी आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस. हरळय्या यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगारांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करण्याकरिता कर्ज पुरवठा करण्यात येतो. या योजनेंतर्गत उत्पादन उद्योगाकरीता रु.50 लाख व सेवा उद्योगाकरीता रु.10 लाख मर्यादीत लाभार्थ्यास बँकेद्वारे कर्ज मंजूर केले जाते. शहरी व ग्रामीण तसेच सर्वसाधारण व मागासवर्गीय प्रवर्गनिहाय 15 ते 35% पर्यंत अनुदान अनुज्ञेय आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज