दि.30 सप्टेंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन
अलिबाग,दि.19 (जिमाका):- अधीक्षक डाकघर रायगड विभाग, अलिबाग या कार्यालयाद्वारे दि.30 सप्टेंबर 2022 रोजी, सकाळी ठीक 11 वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.
या डाक अदालतीत रायगड विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार/ समस्या ज्याचे निवारण 6 आठवडा कालावधीत झालेले नाही, अशा टपाल, स्पीडपोस्ट, काऊंटर सेवा, बचत बँक, मनिऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील.
तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा इ. असणे आवश्यक आहे. इच्छुक ग्राहकांनी आपली तक्रार 2 प्रतीत डॉ.संजय लिये, अधीक्षक डाकघर रायगड विभाग, 402201 यांच्याकडे दि.29 सप्टेंबर 2022 पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी, असे आवाहन अधीक्षक डाकघर रायगड विभाग डॉ.संजय लिये यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment