चला, मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड जोडू, मतदारयादीतील स्वतःची ओळख प्रमाणित करू..!

 

अलिबाग,दि.22 (जिमाका):- भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार दि.1 ऑगस्ट 2022 पासून सर्व मतदारांना आपल्या मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड संलग्न करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखालील रायगड जिल्ह्यातील मतदारांची मतदार ओळखपत्रासोबत आधार जोडणी करण्यासाठी जिल्हा अंतर्गत विविध उपक्रम व विशेष शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. तसेच जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी जिल्ह्यातील सर्व हौसिंग सोसायटीमध्ये आधारकार्ड मतदार कार्डसोबत लिंक करणे यासाठी शिबिराचे आयोजन करण्यासाठी हौसिंग सोसायटीमधील नागरिकांना आवाहन केले आहे.

ज्या नागरिकांना आपल्या हौसिंग सोसायटीमध्ये आधार जोडणी शिबीर आयोजित करावयाचे आहे त्यांनी आपल्या जवळील मतदार नोंदणी कार्यालय (तहसील/ उपविभागीय अधिकारी कार्यालय) येथे संपर्क साधावा.

कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक:-

188 पनवेल विधानसभा मतदारसंघ- 022-27452328 / 022-27469134

189 कर्जत विधानसभा मतदारसंघ- 02148-223499

190 उरण विधानसभा मतदारसंघ- 022-27222129

91 पेण विधानसभा मतदारसंघ- 02143-253000

192 अलिबाग विधानसभा मतदारसंघ- 02141-224434

193 श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ- 02147-222435

194 महाड विधानसभा मतदारसंघ- 02145-222136

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक