दिव्यांगाकरिता उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
अलिबाग,दि.21
(जिमाका):- भारतीय
उद्योजकता विकास संस्था व टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड मुंबई द्वारा आयोजित अलिबाग जिल्हा
उद्योग केंद्र येथे दिव्यांगाकरिता उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम मंगळवार, दि.20
सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक
श्री. जी.एस.हरळय्या यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भारतीय उद्योजकता विकास
संस्थेचे प्रकल्प अधिकारी शशिकांत दनोरीकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री.हरळय्या यांनी प्रशिक्षणाथींना
जिल्हा उद्योग केंद्र द्वारा राबविण्यात येणाऱ्या योजनांविषयी मार्गदर्शन करुन प्रशिक्षणात
शिकविण्यात येणाऱ्या विषयांची सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शशिकांत दनोरीकर यांनी
केले. प्रशिक्षणाकरिता अलिबाग तालुक्यातील दिव्यांग प्रशिक्षणार्थी मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
०००००००
Comments
Post a Comment