राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम : ग्राहक चळवळीत जनतेचा सहभाग आवश्यक- अपर जिल्हाधिकारी शितोळे



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28- प्रत्येक व्यक्ती ही ग्रहक असते. ग्राहकांच्या हक्कांच्या रक्षणासाठी ग्राहक संरक्षण कायदा तयार करण्यात आला आहे. या कायद्याबाबत जनजागृतीसाठी काम करणाऱ्या ग्राहक चळवळीत जनतेचा सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये जनजागृती होऊन त्यांच्या हितांचे रक्षण होईल, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी आज येथे केले.
 राष्ट्रीय ग्राहक दिन 2017 निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे हे होते. यावेळी  जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे सदस्य श्रीकांत कुंभार, राज्य ग्राहक सल्लागार परिषदेच्या सदस्या कल्पना दस्तानी, ग्राहक संरक्षण परिषदेचे मुश्ताक घट्टे, भगवान ढेबे,  जिल्हा पुरवठा अधिकारी एल.एम दुफारे तसेच ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर जनरल अरुणकुमार वैद्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. यावेळी श्रीकांत कुंभार यांनी  उपस्थितांना ग्राहक संरक्षण कायद्याची व कायद्याच्या उपाययोजनासंदर्भात सोदाहरण माहिती दिली.  ग्राहक प्रतिनिधी म्हणून संतोष ठाकूर, मुश्ताक घट्टे, कल्पना दस्तानी यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. त्यानंतर अपर जिल्हाधिकारी शितोळे यांनी  अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी एल.एम दुफारे यांनी केले.
त्यानंतर ग्राहक जागृती संदर्भात आयोजित प्रदर्शनातून उपस्थितांनी माहिती घेतली.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज