पेण अर्बन बॅंकेच्या कर्जदारांना आवाहन; एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ घ्या


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29:- पणन व वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र शासन, यांचे निर्गमित परिपत्रकान्वये कर्जाची प्रभावीपणे वसुली व्हावी याकरिता पेण को ऑपरेटीव्ह अर्बन बँकेच्या सर्व कर्जदारांसाठी शासनाने एकरकमी परतफेड योजना अमलात  आणण्याचा ठराव  दि. 22 नोव्हेंबर रोजीच्या सभेत करण्यात आला आहे.
या एकरकमी परतफेड योजनेसाठी कर्जदारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत दि.28 फेब्रुवारी 2018 अशी आहे. या मुदतीत प्राप्त  अर्जांचा विचार करण्यात येईल. एकरकमी कर्ज परतफेड योजनेच्या शर्ती व अटीनुसार यापुढे कोणत्याही कर्जदारांस पुन्हा एकरकमी कर्ज परतफेड योजनेजेचा लाभ घेता येणार नाही. तरी बँकेच्या सर्व थकीत कर्जदारांनी एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ घेऊन आपली कर्जखाती बंद करावीत व तसा बेबाकी दाखला घ्यावा, असे आवाहन प्रशासक मंडळ,दि.पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लि. पेण यांनी केले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान