सहकार पुरस्कार 2016-17 साठी संस्थांकडून प्रस्ताव मागविले
अलिबाग, जि. रायगड, दि.29- शासनातर्फे दरवर्षी सहकारी
संस्थांना पुरस्कार देण्यात येतो. त्यासाठी संस्थांकडून प्रत्येक जिल्ह्यातून सहकारी
संस्थांचे प्रस्ताव मागविणे, छाननी करणे, मुख्यालयास प्रस्ताव सादर करणे यासाठी
कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे, तो याप्रमाणे-
सोमवार दि.1 जानेवारी 2018रोजी
सहकार पुरस्कार कार्यक्रमास प्रसिद्धी देणे.
मंगळवार दि.2 ते 16 जानेवारी सहकारी संस्थांनी आपले
पुरस्कारासाठीचे प्रस्ताव आपापल्या तालुका
सहाय्यक निबंधक/ उपनिबंधक यांच्याकडे सादर करणे.
बुधवार दि.17 ते शनिवार दि.20 जानेवारी तालुका सहाय्यक निबंधक/
उपनिबंधकांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे छाननी करुन प्रस्ताव सादर करणे, सोमवार दि.22 ते 29 जानेवारी जिल्हा उपनिबंधक
समितीने छाननी करुन प्रस्ताव विभागीय सहनिबंधक यांच्याकडे सादर करणे, मंगळवार
दि.30 जानेवारी ते 6 फेब्रुवारी विभागीय
सहनिबंधक समितीने छाननी करुन प्रस्ताव सहकार आयुक्त कार्यालयाकडे सादर करणे, बुधवार, दि.7 ते 16 फेब्रुवारी सहकार आयुक्त स्तरावरील समितीने प्रस्ताव छाननी
करुन शासनाकडे पाठविणे. शनिवार दि.17 ते 26 फेब्रुवारी शासनस्तरावर
सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पुरस्कार प्राप्त संस्थांची अंतिम
निवड करणे, त्यानंतर पुरस्कार वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल.
तरी
जिल्ह्यातील सहकारी संस्थांनी आपापल्या तालुकास्तरावरील सहाय्यक/ उप निबंधक
कार्यालयांकडे प्रस्ताव दाखल करावा, असे आवाहन
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment