जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांनी पुरस्कारासाठी सहभाग नोंदवावा--जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे

 

 

अलिबाग(जिमाका)दि.9 :- राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याबाबतचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचा दि.04  जुलै 2023 चा शासन निर्णय झाला आहे. या शासन निर्णयान्वये दि.19 सप्टेंबर 2023 रोजीपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सव राज्यातील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी रायगड जिल्ह्यातील जास्तीस्त जास्त गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी  डॉ.योगेश म्हसे यांनी आवाहन केले आहे.

 या पुरस्कार निवड करण्यासाठी कार्यपध्दती पुढीलप्रमाणे राहील :-या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीसांकडे परवानगी घेतलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. गणेशोत्सव मंडळाने करावयाच्या अर्जाचा नमुना, शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट-अ मध्ये आहे. या अर्ज व सहभागासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळाने पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर दि.10 ऑगस्ट 2023 ते दि.05 सप्टेंबर 2023 पूर्वी ऑनलाईन अर्ज पाठवावेत.

त्याअनुषंगाने उपविभागीय स्तरावरील निवड समिती गणेशोत्सव उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देतील. तसेच व्हिडीओ व आवश्यक कागदपत्रे गणेशोत्सव मंडळांकडून प्राप्त करून घेतील. ही समिती प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत शासन निर्णयातील तक्त्यानुसार गुणांकन करुन त्यातील एक उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस करुन त्याची संबंधित कागदपत्रे, व्हिडीओ व गुणांकन जिल्हास्तरीय समितीकडे दि.29 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करतील व जिल्हास्तरीय समिती राज्य समितीकडे दि.01 ऑक्टोबर 2023 पर्यंत सादर करतील.

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत