सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारासाठी अर्ज करण्यास दि.15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

 

 

अलिबाग,दि.10(जिमाका):- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी दि.10 ऑगस्ट पर्यंत अर्ज  सादर करावेत, असे कळविण्यात आहे होते.

 परंतु या विविध पुरस्कारांसाठी सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना अर्ज करण्यासाठी दि.15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त  समाज कल्याण सुनिल जाधव यांनी दिली आहे.

 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनिय कार्य करणारे समाजसेवक/व्यक्ती यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. 2020-21, 2021-22 व 2022-23 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या विविध पुरस्कारासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज